फलटण : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे याने शनिवारी रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून सरेंडर केलं आहे. रात्री जवळपास साडेबारा वाजता तो पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यानंतर त्याला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. रात्री एकच्या सुमारास त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं. त्यानंतर पहाटे चार वाजता त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
निलंबित पीएसआय गोपाळ बदने याला आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथे दौरा असून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे होताना दिसत आहेत. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पंढरपुरात शोध घेतला जात होता. कारण त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी रात्री गोपाल बदने याचं पंढरपुरात लोकेशन मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला होता. अशातच आता गोपाल पंढरपुरात होता, अशी माहिती आहे.
पीएसआय गोपाल बदणे दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्याने थेट पोलीस चौकीत हजेरी लावली. बदने सोलापूरच्या काही पोलिसांच्या तो सोशल मीडियावरून संपर्कात होता, अशी माहिती देखील समोर आली होती. पोलिसांनी कुटूंबायांना त्याला हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याचं कळल्यानंतर बदनेला धक्का बसला अन् तो पोलीस चौकीत हजर झाला.
संबंधित डॉक्टर बरोबर काय संबंध होते?
दरम्यान पीएसआय बदणे एका स्थानिक पत्रकाराला कळवून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. पीएसआय बदणे याने मी कुठलाही बलात्कार केला नसल्याचा तपासात खुलासा केला. मात्र संबंधित डॉक्टर बरोबर काय संबंध होते हे तो सांगत नसल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. आज रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने सुट्टीच्या कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे.
पण संबंधित डॉक्टरसोबत त्याचे काही संबंध होते का? किंवा दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याबाबत बदणे काहीही बोलला नाही. त्याने या सगळ्यावर अद्याप मौन बाळगल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या बलात्काराच्या आरोपांचा तपास करण्याचं महत्त्वाचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
डॉक्टर तरुणी हॉटेलवर का गेली?
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर तरूणीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर तरूणी ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावरती डॉक्टर महिला राहत होती. महिला ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला कुलूप लावल्याने अनर्थ घडला. आत्महत्येपूर्वी आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर प्रशांत बनकरने तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असं म्हटल्याचं सांगितलं जातंय. ऐनवेळी कुठं जायचं म्हणून महिला डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. मानसिक तणावात असणाऱ्या डॉक्टर तरूणीने यासंदर्भात पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना वारंवार कॉल केले होते, अशी माहिती माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर तरूणी प्रशांत बनकरच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. 23 तारखेला पहाटे 1.30 वाजता महिला डॉक्टरने फलटण येथील मधूदीप हॉटेल मध्ये ङ्गङ्घचेक इनङ्घङ्घ केलं होतं. यावेळी डॉक्टरने हॉटेलची रूम 2 दिवसांसाठी बुक केली होती. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना डॉक्टर तरूणीसोबत कोणी नव्हतं. डॉक्टर, पीएसआय बदने आणि बनकर यांच्यात अनेक कॉल झाले. दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे 23 तारखेला संध्याकाळी 4 वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले त्यावेळी डॉक्टर तरूणीचा मृतदेह आढळला.